'दिवाळी अंक २०२४ - सर्वोत्तम मुखपृष्ठ स्पर्धा'

दिवाळी अंकांच्या समृद्ध परंपरेने महाराष्ट्रात सुजाण वाचक निर्माण करण्यासोबतच अनेक संपादक, साहित्यिक, चित्रकार, आणि व्यंगचित्रकारही घडविले. त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवुन देण्यात दिवाळी अंकांचा वाटा निश्चितच मोलाचा आहे.
आपली कला, डिजिटल तंत्रज्ञान आणि आधुनिक छपाई माध्यमांचा सुयोग्य वापर करून दिवाळी अंकांना देखणं रूप बहाल करणाऱ्या चित्रकार मंडळींचा योग्य सन्मान व्हावा या प्रामाणिक भावनेतुन 'अक्षरगंध' संस्थेने सालाबादप्रमाणे 'दिवाळी अंक २०२४ -सर्वोत्तम मुखपृष्ठ स्पर्धा' आयोजित केली आहे.
या स्पर्धेत सहभागी अंकामधून...
1. सर्वोत्तम मुखपृष्ठ
2. सर्वोत्तम मांडणी व सजावट
3. सर्वोत्तम अंक
अशा तीन विभागातून प्रत्येकी किमान 1 ते कमाल 3 विजेते निवडले जातील.
📕 सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि भेटवस्तू असे बक्षिसाचे स्वरूप असेल.
📗 आपल्या दिवाळी अंक - २०२४ च्या २ प्रती अक्षरगंधच्या खालील पत्त्यावर बुधवार दि. १३ नोव्हेंबर पर्यंत पाठविणे.
📘 कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ याच महिन्यात सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होईल.
संकल्पना: ब्रँडबाँड निलेश B+
निमंत्रक आणि सह-आयोजक:
I अक्षरगंध I प्रतिभा प्रकाशन I उगमक्रिएटिव्ह I उद्योगऊर्जा I
अंक पाठविण्याचा पत्ता:
अक्षरगंध, C-३, तळमजला, जय महालक्ष्मी अपार्टमेंट, बँक ऑफ बडोदा / रामकृष्ण बाजारच्या समोर, जोंधळे शाळेजवळ, जुनी डोंबिवली रस्ता, डोंबिवली (पश्चिम), जि. ठाणे, महाराष्ट्र. ४२१ २०२ .
संपर्क - 9920 100 308 / 8879 230 443
कृपया ही पोस्ट आपल्या संपर्कातील अधिकाधिक साहित्यिक गटांमध्ये पाठवावी, ही विनंती. धन्यवाद🙏🙏
विशेष सूचना - अपेक्षित सहभाग न मिळाल्यास 'दिवाळी अंक २०२४ - सर्वोत्तम मुखपृष्ठ स्पर्धा' पुढे ढकलण्याचे अथवा रद्द करण्याचे सर्वाधिकार आयोजकांनी राखून ठेवले आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.
____________________________________
कै. बाळ बागवे स्मृती लघुकथा स्पर्धा - २०२४

पोस्टवर आपण लाईक कमेंट करून शेयर देखील करू शकता. धन्यवाद!